Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खामगावात स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश प्रेस करण्याचा उपक्रम

khambagaon news

बुलढाणा प्रतिनिधी । रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिनाच्या दुग्धशर्करा योग असल्याने महाराष्ट्र राज्य सर्व व भाविक धोबी परीट समाज महासंघ खामगावच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

यानिमित्त या महासंघाच्या वतीने शाळकरी मुलांना गणवेश मोफत प्रेस करून देण्यात येणार आहे. ही सर्व सेवा तुका अण्णा निंबाळकर फरशी, योगेश चांदोरकर केशवनगर, शंकर शेजवलकर सुटाळपुरा, लीलाधर निंबाळकर किसन नगर, निलेश जामोदे फरशी, शुभम बावस्कर तायडे कॉलनी, विशाल मोरे सजनपुरी प्रकाश पूर्व शिवाजी वेस, गणेश परदेशी बालाजी प्लॉट, विनोद बुंदेले सदी फाईल, अजय पूर्वे वामन नगर टाकीजवळ येथे उपलब्ध असणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य सर्वभाषिक धोबी परीट समाज महासंघ खामगाव च्या वतीने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Exit mobile version