Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फेसबुकवर खडसेंची बदनामी : कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करणार्‍या फेसबुक युजरवर कारवाई करण्याची मागणी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आज मुक्ताईनगर येथील पोलीस स्थानकात निवेदन देऊन विजय डोके या फेसबुक युजरच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संबंधीत युजरने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट आणि चित्रफीत शेअर केली असून यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या युजरवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला आहे.

हे निवेदन देतांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, सुभाष पाटील, पक्षाच्या सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, शहराध्यक्ष राजू माळी, सुनील काटे, सांस्कृती विभागाचे तालुकाध्यक्ष अजय तळेले, युवकचे तालुकाध्यक्ष राशीद खान, बापू ससाणे, विनोद काटे आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

 

Exit mobile version