Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडसे हे नेहमीच आमच्या संपर्कात होते : संजय राऊत

sanjay raut eknath khadse

 

मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसे हे नेहमीच आमच्या संपर्कात होते, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

एकनाथ खडसेंनी कालच भाजपवर आगपाखड केल्यामुळे त्यांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत, असा प्रश्न विचारल्यावर, खडसे हे नेहमीच आमच्या संपर्कात होते, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. अजित पवार यांच्याविरोधातील सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले. मी, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचा फटका भाजपला बसल्याचा घणाघातही खडसेंनी केला होता.

Exit mobile version