Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडसे तीन महिन्यांपासून संपर्कात – पवार

khadse pawar1

मुंबई प्रतिनिधी । एकनाथराव खडसे हे आपल्या तीन महिन्यांपासून संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला असून ते आपल्या पक्षात येणार की नाही हे अनिश्‍चीत असल्याचेही नमूद केले आहे.

भाजपचे मातब्बर नेते एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने आज राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुक्ताईनगर येथे खडसेंची भेट घेणार असल्याची माहितीदेखील समोर आलेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, ठाणे येथील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी खडसे हे तीन महिन्यांपासून आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. कुणीही पक्ष बदलण्याचा विचार तात्काळ करत नसतो अशी पुस्ती जोडून एकनाथराव खडसे यांचा जन्म बारामतीचा असल्याचे सूचक वक्तव्यदेखील केले आहे.

Exit mobile version