Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडसे महाविद्यालयातील पोलीस भरती पूर्व परीक्षेला प्रतिसाद

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित, खडसे महाविद्यालयात २३ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या पोलीस भरती पूर्व परिक्षेला विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले.

भविष्य काळातील नोकरीच्या संधी लक्षात घेऊन क्रीडा विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये अशा स्पर्धांसाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या तयारी करण्याच्या उद्देशाने प्रा. डॉ.प्रतिभा ढाके (क्रीडा संचालक) यांनी २३ जानेवारी ते ७ फेब्रुवारी रोजी दरम्यान मुक्ताईनगर शहरातील खडसे महाविद्यालयात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन केले. यामुळे आमच्यात स्पर्धाकालीन जीवनात आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाल्याचे आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी सांगितले. या प्रशिक्षणात जवळजवळ ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यात २० मुले तर १९ मुलींचा सहभाग असल्याचे दिसून आले.

Exit mobile version