Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाथाभाऊंची समर्थकांशी चर्चा

4Eknath 7

मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे हे संभाव्य पक्षांतराबाबत आपल्या समर्थकांशी चर्चा करत असून त्यांनी या अनुषंगाने दिवसभर चर्चा केली.

माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपला जय श्रीराम करण्याच्या स्थितीत दिसून येत आहेत. त्यांनी स्वत: अनेकदा या वृत्ताचे खंडन केले असले तरी सध्या घडणार्‍या घटनांचा मागोवा घेतला असता ते याबाबतचा निर्णय घेऊ शकतात. ते राष्ट्रवादी अथवा शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यतादेखील आहे. येत्या काही दिवसात मंत्रीमंडळाची विस्तार होण्याची शक्यता असल्याने एकनाथराव खडसे यांनी रविवारी दिवसभर मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावतांनाच आपल्या समर्थकांशी चर्चा केली. त्यांनी कुर्‍हा-काकोडा परिसरातील आपल्या समर्थकांकचे पक्षांतराबाबतचे मत जाणून घेतले. याप्रसंगी बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाथाभाऊ जो निर्णय घेतील त्याला आपला पाठींबा असल्याचे सांगितले.

Exit mobile version