Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडकी ब्रु. येथे एकाची गळफास लावून आत्महत्या

चाळीसगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव  तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ३५ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सकाळी समोर आली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील प्रविण बिप्टा जाधव (वय-३५) याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहेत. त्यावर भाऊ विलास बिप्टा जाधव यांनी प्रवीणयास  ग्रामीण रुग्णालयात मृत अवस्थेत दाखल केले. मयताचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नसून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना मुकेश पाटील हे करीत आहेत.

 

Exit mobile version