Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केऱ्हाळा येथे रिक्षा अपघातात महिला शेतमजूर ठार; बारा जण जखमी

Accident

रावेर प्रतिनिधी । रिक्षात बसून शेतात जात असतांना पुलाजवळ रिक्षा पलटी झाल्याने एक महिला शेतमजूर जागीच ठार झाल्या तर बारा महिला जखमी झाल्याची घटना आज तालुक्यातील केऱ्हाळा येथे घडली. जखमींना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

सविस्तर माहिती अशी की, चालक प्रविण महाजन (वय 33) यानी आपल्या रिक्षा (एमएच 19 एएक्स 7674) महिला शेतमजूरांना शेतात घेवून जात होता. रिक्षा तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द जवळुन रसलपुरच्या दिशेने येतांना भोकर नदीच्या पुलाजवळ पलटी झाली. या अपघातात कमलबाई धर्मा निकम (वय-50) या जागीच ठार झाल्या तर कौशल्याबाई भालेराव, कमलाबाई निकम, उषा अटकाळे, नफीसा तडवी, मीरा तडवी, फातमा तडवी, जेवरा तडवी, सुबनूर तडवी, नुसिर तडवी, देवराबाई तडवी, सोनी तडवी, शबाना तडवी सर्व रा. केऱ्हाळा या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रावेर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Exit mobile version