Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मु.जे. महाविद्यालयातील पत्रकारिता विभागातर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात

KCE vidyalay news

जळगाव प्रतिनिधी । मू.जे.महाविद्यालयातील जनसंवाद व पत्रकारिता विभागातर्फे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. विभागप्रमुख प्राध्यापक संदीप केदार यांनी प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

वाचन ही आपली व आजच्या काळाची गरज आहे. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे त्यांच्या जीवनातून साधेपणाने मार्गदर्शकाची भूमिका करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या जीवन कार्यातून दिलेला संदेश विद्यार्थ्यांनी अंमलात आणावा, असे विचार विभागप्रमुख यांनी व्यक्त केले.

विभागातील विद्यार्थिनी अपूर्वा वाणी ,अंजली बियाणी यांनी आपले मनोगत व्यक्त व्यक्त केले. विद्यार्थ्यांसाठी विभागांतर्गत वाचनालय अशा कल्पना मांडण्यात आली .याला अनुसरून अभय सोनावणे यांनी या वाचनालयासाठी शंभर पुस्तके देण्याचे आश्वासन दिले.तसेच विद्यार्थ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेली पाच पाच पुस्तके विभागात जमा करून पुस्तक भिशी सुरु करण्याची तयारी दाखवली .व दर आठवड्याला पुस्तक परिचय करून दयायचा असे ठरले. यावेळी प्रा.संदीप केदार ,प्रशांत सोनावणे ,संजय जुमनाके ,केतकी सोनार तसेच विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version