Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केसीइच्या एमबीए विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची सुप्रीम कंपनीत भेट

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  केसीई काॅलेजच्या एमबीए विद्याथ्र्यांची सुप्रिम कंपनीला इन्डस्ट्रीयल व्हिजीट एमआयडीसी मधील सुप्रिम इन्डस्ट्री लिमिटेड या कंपनीला केसीई सोसायटीच्या काॅलेज आॅफ इंजिनिअरींग आणि मॅनेजमेंटच्या 3 शाखा – मॅनेजमेंट, अॅग्री बिझनेस आणि फिनटेकच्या विद्याथ्र्यांनी इन्डस्ट्रीयल व्हिजीट दिली. या व्हिजीट मध्ये सुप्रिम कंपनीचे प्रतिनीधी रविकिरण कोंबडे-जनरल मॅनेजर (आॅपरेशन), धनंजय जेऊरकर- डिजीएम एच.आर., अभय चैधरी – मेंटनेंस मॅनेजर आणि मनिष पाठक – एच.आर.मॅनेजर यांनी कंपनीचे प्रोडक्शन अॅण्ड आॅपरेशन सिस्टम, मेन्टेनंस, इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट एच.आर. सिस्टम याबद्दल चांगली माहिती दिली जेणे करून विद्याथ्र्यांना त्यांच्या भविष्यात एक चांगला उद्योजक बनण्यास मार्गदर्शक ठरेल आणि चांगले मॅनेजमेंट विद्याथ्र्यांना स्व कंपनीत किंवा इतर कंपनीत उत्कृष्ट मॅनेजर म्हणून करता येईल.

नंतर दुपारी 02 ते 04 या वेळेत विद्याथ्र्यांनी आर.सी.बाफना गो अनुसंधान केंद्र, कुसुंबा येथे भेट देऊन, तेथील मॅनेजमेंट आणि रिसर्च बद्दल माहिती घेतली. या भेटीमध्ये एकुण 63 विद्यार्थी आणि 06 प्रोफेसर उपस्थित होते.

या भेटीसाठी केसीई काॅलेजचे प्राचार्य डाॅ.संजय सुगंधी आणि उपप्राचार्य डाॅ.प्रज्ञा विखार यांनी मार्गदर्शन केले. या भेटीचे को-आॅर्डीनेशन प्रो.रविंद्र स्वामी – एमबीए अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट विभाग प्रमुख, प्रो.हेमंत धनंधरे, प्रो.गुंजन चैधरी, प्रो.आरती लुल्ला, प्रो.कोमल जैन, प्रो.तानिया भाटीया यांनी केले. इन्डस्ट्रीयल व्हिजीटच्या यशस्वीतेसाठी प्रो.वीना भोसले, प्रो.मयुर बोरसे, प्रो.निकीता बालाणी, प्रो.हर्षा देशमुख, प्रो.डिगंबर सोनवणे, प्रो.शेफाली अग्रवाल यांनी सहकार्य केले.

Exit mobile version