Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूण कुढापा चौकातील भाविकाकडून कावड यात्रा संपन्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील तरुण कुढापा चौक येथील रहिवाशी रवींद्र चौधरी यांच्या वतीने मागील ४० वर्षा पासून कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तरुण कुढापा चौक ते भाटिया मार्केट मधील महादेव मंदिरा पर्यंत कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या कावड यात्रेचे पूजन शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. दरवर्षी भाविक यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित रहात असतात. मागील ४० वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या कावड यात्रेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असल्याचे आयोजक रवींद्र चौधरी यांनी सांगितले.

यावेळी प्रशांत सुरळकर, रोहिणी सुरळकर, पिंटू चौधरी, विकास धोबी, ललिता चौधरी, चंद्रकला चौधरी, योगिता चौधरी, शोभा चौधरी, सुनिता चौधरी, विमा चौधरी, दिपाली चौधरी, गायत्री चौधरी, राजेंद्र चौधरी, शांताराम चौधरी, दगडू चौधरी, फकीरा चौधरी, भगवान चौधरी, कमलबाई चौधरी, देवकाबाई चौधरी, कल्पना चौधरी, विनोद चौधरी, गणेश चौधरी, किशोर चौधरी आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version