Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात पाटा घालून हत्या

crime bedya

नवी मुंबई वृत्तसंस्था । चारित्र्याच्या संशयावरून वारंवार होणाऱ्या कौटुंबिक वादातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून तिची हत्या केल्याची घटना शुक्रवारी खांदा कॉलनी सेक्टर-९ मधील सौरभ सोसायटीत घडली.

नानासाहेब बबन लांडगे (३५) असे या पतीचे नाव असून खांदेश्वर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी पती नानासाहेब लांडगे हा पत्नी कल्पना (३०) व दोन मुलीसह खांदा कॉलनी सेक्टर-९ मधील सौरभ सोसायटीत राहण्यास होता. महिनाभरापूर्वीच नानासाहेब या ठिकाणी राहण्यास आला होता. नानासाहेब याला पत्नी कल्पना हिच्या चारित्र्याच्या संशय होता. याच कारणावरून त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत होते. गुरुवारी रात्रीही या पती पत्नींमध्ये याच कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर घरातील सगळे झोपले असताना पहाटे ३.३०च्या सुमारास नानासाहेब याने गाढ झोपेत असलेल्या आपल्या पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा टाकून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने जवळच राहणाऱ्या आपल्या वडिलांना याबाबतची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन कल्पनाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नानासाहेब याला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली.

Exit mobile version