Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंतुर्लीत उद्या कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अंतुर्ली येथील कार्तिक स्वामींचा यात्रौत्सव स्वामी उद्या ता.२६ पासून कृतिका नक्षत्र पासून सुरु होत आहे.

कार्तिक स्वामीचे दर्शन भाविकांना उद्या दुपारी २ वाजून पाच मिनीटांपासुन तर सोमवार ता.२७ दुफारी १ : ३५ पर्यंत या शुभ मुूहर्तावर दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे. हा योग वर्षातून एकदाच येत असल्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. यामुळे या यात्रोत्सवाला महाराष्ट्रच्या काना कोपर्‍यातून भाविक दर्शनासाठी येतात.

हा यात्रोत्सव बोरी नदी काठावर भरविला जातो. या बोरी नदीवर पाण्याचा साठवण बंधारा बांधण्यात आल्याने यावरून पडणारे पाण्याचे विहंगम दृश्य पाहण्यासारखे आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील तीन मंदिरापैकी अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील एक मंदिर आहे. या यात्रौउत्सवाचे संपूर्ण खान्देशांत महत्व असल्याने दोन दिवस लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. दरम्यान मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकानी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर संस्थांनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version