Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर्मचाऱ्याचे काम बंद आंदोलन

chopada karmachari

चोपडा प्रतिनिधी । येथील नगरपालिकेचे कर्मचारी यू.बी.खेवलकर यांना सुनील दहिवेलकर रा.चोपडा यांनी (दि. 4 जुलै) रोजी, सायंकाळी ७ वाजता नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात येऊन मारहाण करण्याची धमकी दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, सुनिल दहिवेलकर हे नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील शासकीय कामात अडथळा निर्माण करुन, अर्वाच भाषेत शिवीगाळ केली आहे. त्याचबरोबर मारहाण करण्याची धमकी दिल्यामुळे खेवलकर घाबरले असून, खेवलकर हे अपंग आहेत. म्हणून जोपर्यंत जोपर्यंत ठेकेदारावर कायदेशीर कार्यवाही होत नाही तो पर्यंत नगर पालिका कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

Exit mobile version