Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा येथील विवेकानंद विद्यालयातर्फे ‘कारगील विजय दिन’ साजरा (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 07 27 at 5.45.54 PM

चोपडा, प्रतिनिधी |येथील विवेकानंद विद्यालयातर्फे शहरातील कारगील चौकात साफसफाई करून कारगील विजय दिन साजरा करण्यात आला. देशभरात २६  जुलै हा दिवस “कारगील विजय दिन ” म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्यभावना आणि अभिमान वृद्धिंगत होण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला.

हा अनोखा उपक्रम विद्यालयाच्या विश्वस्ता मंगला जोशी व मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या संकल्पनेतून साकारला गेला. विद्यालयातील इयत्ता नववी ब चे स्काऊट गाईडचे विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या जवळच असलेल्या कारगिल चौकात जाऊन चौकाची संपूर्ण साफसफाई केली. चौक फुल हार,विविध रंगीत फुलं,रांगोळीने सुशोभित केला.विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या हस्ते मेणबत्ती पेटवीत कारगिल युद्ध जिंकण्यासाठी शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी विद्यालयातील उपशिक्षक पवन लाठी, उपशिक्षिका सरला शिंदे,कलाशिक्षक राकेश विसपुते,उपशिक्षक हेमराज पाटील,प्रकाश जाधव यांनी परिश्रम घेतले.या सर्वांचे या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय पोतदार,संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विकास हरताळकर,उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल,सचिव अॅड रवींद्र जैन यांनी अभिनंदन व कौतुक केले.

 

 

 

 

Exit mobile version