Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारण नसतांना खडकी येथील महिलेला मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काहीही कारण नसतांना महिलेला घरासमोर सात जणांनी येवून शिवीगाळ करून लोखंडी वस्तूने डोक्यात मारून दुखापत केली तर सोन्याची पोत तोडून नुकसान केल्याची घटना तालुक्यातील खडकी येथे घडली. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जयश्री सचिन पाटील (वय-२६) रा. खडकी ता. चाळीसगाव या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी ३ जुलै रोजी सायंकाही साडेसहा वाजेच्या सुमारास महिला तिच्या घराच्या समोर उभी असतांना गल्लीत राहणारे मुरलीधर दौलत मांडोळे, भिमराव दौलत मांडोळे, सतिष दौलत मांडोळे, ज्ञानेश्वर मुरलीधर मांडोळे, मिनाबाई भिमराव मांडोळे, अरूणाबाई सतिष मांडोळे आणि छायाबाई मुरलीधर मांडोळे सर्व रा. खडकी ता. चाळीसगाव यांनी लाथाबुक्क्यांनी महिलेला मारहाण केली. तर यातील मुरलीधर मांडोळे याने हातीतील लोखंडी वस्तून महिलेच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली शिवाय महिलेच्या गळ्यांनी सोन्याची पोत तोडून नुकसान केल्याचे समोर आले. महिलेने जखमी अवस्थेत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून सात जणांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी मुरलीधर दौलत मांडोळे, भिमराव दौलत मांडोळे, सतिष दौलत मांडोळे, ज्ञानेश्वर मुरलीधर मांडोळे, मिनाबाई भिमराव मांडोळे, अरूणाबाई सतिष मांडोळे आणि छायाबाई मुरलीधर मांडोळे सर्व रा. खडकी ता. चाळीसगाव यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर सोनवणे करीत आहे.

Exit mobile version