Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री क्षेत्र कपिलेश्‍वर महादेव मंदिराच्या यात्रेस प्रारंभ

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलेश्‍वर महादेव मंदिरावर आज महाशिवारात्रीपासून यात्रोत्सव सुरू झाला आहे.

तापी व पांझरा नदीच्या पवित्र संगमावर वसलेल्या श्रीक्षेत्र कपिलेश्‍वर येथे आजपासून सलग १५ दिवस यात्रा सुरू राहणार आहे. श्रीक्षेत्र कपिलेश्‍वर महादेव मंदिर हे पुरातन जागृत देवस्थान असून अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे संपूर्ण अखंड पाषाण आणि बांधलेले हे हजारो वर्षापूर्वीचे हेमाडपंथी मंदिर आहे पूर्व मुखी असलेल्या मंदिरातील खोलवर गाभार्‍यात काळापासूनची सुबह शिवलिंग साकारण्यात आले आहे उगवत्या सूर्याची किरणे थेट शिवलिंगावर अस्थिर होतात तर मंदिरासमोर असलेल्या तापी नदीच्या डोहात मंदीराचे प्रतिबिंब हुबेहूब दिसते. महाराष्ट्रातील १०८ महादेव मंदिरापैकी एक कपिलेश्‍वर महादेव मंदिर तीर्थक्षेत्र असल्याची नोंद स्कंदपुराणात आहे. निम व अडावद या दोन्ही गावाच्या विश्‍वस्तांनी एकत्र आणून निम येथील व कळमसरे येथील माजी लिपिक मगन पाटील यांच्यावर मंदिराची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या काळात मंदिराचा आजूबाजूच्या परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊन एक चांगले पर्यटक म्हणून उदयास आलेले आहेत. आतापर्यंत या ठिकाणी अनेक शाळा महाविद्यालयातील शैक्षणिक सहली आलेल्या आहेत. हंसनंद महाराजांनी संस्कृत बाल पाठशाला सुरू केली असून बालके पाठशाळेत परिसरातील निवासी आहेत.

दरम्यान, आज यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. कळमनुरी येथील शारदा माध्यमिक विद्यालयाचे प्रशासनाधिकारी जी. टी. टाक यांच्या मार्गदर्शनाखाली स्काउटचे विद्यार्थी व स्काऊट शिक्षक डी.डी राजपूत, सूर्यवंशी सर राठोड सर, भवरे सर यांनी यंदादेखील परिसरात स्वच्छता राखण्याची जबाबदारी उचलली आहे.

Exit mobile version