Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळच्या कांतीलाल पाटील यांचे युपीएससी परिक्षेत यश

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील तपत कठोरा येथील मूळ रहिवासी असणारे कांतीलाल सुभाष पाटील यांनी युपीएससीच्या नागरी सेवा परिक्षेत यश संपादन केले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीच्या नागरी सेवा (सिव्हील सर्व्हीसेस) परिक्षेचा निकाल आज लागला. याची मुख्य परिक्षा २०१९च्या उत्तरार्धात झाली होती. यानंतर मुलाखती होऊन आज याचा अंतिम निकाल लागला आहे. यात देशभरातील एकूण ८२९ विद्यार्थ्यांची रँकींगनुसार आयएएस, आयपीएस, आयएफएस आदी विविध वर्गवारीत निवड करण्यात येणार आहे. यात भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथील मूळ रहिवासी असणारे कांतीलाल सुभाष पाटील हे ४१८ वी रँक मिळवून यशस्वी झाले आहेत. पदांच्या उपलब्धतेनुसार त्यांची भारतीय पोलीस सेवा अथवा अन्य सेवांमध्ये नियुक्ती होणार आहे.

युपीएससी परिक्षा ही अतिशय खडतर अशी मागली जाते. देशभरातील अत्यंत हुशार विद्यार्थी यात सहभागी होत असतात. यात यश संपादन करणे हे खूप कठीण असते. या पार्श्‍वभूमिवर कांतीलाल सुभाष पाटील यांनी मिळवलेले यश हे अतिशय कौतुकास्पद असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version