Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कन्नड घाटात आग; अनेक वृक्ष व वन्य जीवांचे नुकसानीची भीती

chalisgaon ghat

चाळीसगाव प्रतिनिधी । शनिवारी दुपारपासून कन्नड घाटातील म्हसोबा पॉइंटजवळ असलेल्या वनात धूर निघत असल्याची बातमी वनविभाग वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना काही प्रवाशांनी दिली. माहिती मिळाल्यानंतर वनविभागांचे कर्मचारी तात्काळ या ठिकाणी दाखल झाले. ही आग खालच्या बाजूने लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लागलीच या कर्मचाऱ्यांनी आग विजवण्यासाठी प्राथमिक उपचार सुरू केले असून झाडांच्या फांद्या माती वाळू टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

यानंतर वायु मारून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र आग लागलेली जागा ही अवघड असून त्याठिकाणी कर्मचाऱ्यांना उभे राहणेही शक्य होत नव्हते. तसेच वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने आगीने जास्त वेगाने भडका घेत पेट घेतला. त्यानंतर आगीने आगीने रौद्र रूप धारण केले आहे. आग विझविण्यासाठी वन्यजीव विभागाचे जवळपास 30-35 कर्मचारी अधिकारी काम करती आहे. अशी माहिती आरएफओ श्री.चव्हाण यांनी दिली. मात्र निश्चित किती हेक्टर क्षेत्रांमध्ये आग लागली असेल व नुकसान किती झाले असेल ते आता रात्रीच्या अंधारात सांगता येणार नाही. याबाबतचा सविस्तर खुलासा सकाळी करता येईल असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version