Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कंजरवाड्यातील गावठी हातभट्टीवर धाड; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

kanjar wada

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंगापूर कंजरवाडा परीसरात अवैधरित्या दारूची हातभट्टीवर एमआयडीसी पोलीसांनी छापा टाकून सुमारे 1 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंगापूर कंजरवाडा परीसरात राहणाऱ्या बबलुबाई विनायक कंजर (वय-65) या महिलेने अवैधरित्या व बेकायदेशीर गावठी हातभट्टी लावून दारू तयार करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसात मिळाली. पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोकॉ सचिन चौधरी याच्यासह पथकाने घटनस्थळी पाहणी केली. यावेळी कंजरवाड्यात एका दारूची भट्टीवर आज सकाळी 7 वाजता छापा टाकून महिलेला ताब्यात घेतले. यावेळी 1 लाख 13 हजार रूपये किंमतीचे 2700 लिटर कच्चे दारूचे रसायन, गुळ, नवसागर व 200 लिटर माप्या 14 पत्री ड्रम, व 2 हजार 500 रूपये किंमतीचे पक्क रसायन पत्री ड्रममध्ये तीन दगडांचे चुलवर उकळते आणि 4 हजार 200 रूपये किंमतीचे गावठी हातभट्टीची 70 लिटर तयार दारू प्लॅस्टीक कॅनमध्ये आढळून आले. असे एकुण 1 लाख 20 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पो.कॉ. किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात बबलुबाई कंजर हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version