राज्यपाल-मुख्यमंत्री वादात कंगनाची उडी

मुंबई । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्रात मंदिर कुलूपबंद का ? असा प्रश्न राज्यपालांनी उपस्थित केला असून राज्यपालांच्या या विचारण्याला अभिनेत्री कंगनाने पाठिंबा दर्शवत भाजप कार्यकर्त्यांसोबत मंदिरे खुली करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात उडी घतली आहे.

बार- रेस्टॉरंट सुरू झाले, देवच कुलूपबंद का ?, असा प्रश्न राज्यपाल कोश्यारी 

यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसंच हिंदुत्वाचा विसर पडला का ?, असंही राज्यपालांनी त्यांना विचारलं आहे. मदिरं सुरू करू नयेत असे काही दैवी संकेत मिळतात का? असं विचारत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

याच मुद्द्यावर आता कंगणाने देखील राज्यपाल-मुख्यमंत्री वादात उडी घेतली, पुन्हा एकदा अभिनेत्री कंगणाने महाराष्ट्राचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  कंगनाने आपल्या ट्विट मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना गुंड सरकार असं म्हटल आहे. मागील काही काळापासून महाराष्ट्र सरकारविरोधात भूमिका घेणारी अभिनेत्री कंगनाने ट्विटरवरुन महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा टोला लगावला आहे.

कंगनाने ट्विट करत म्हटले आहे की, माननीय राज्यपाल साहेबांनी गुंडा सरकारला प्रश्न वीचारला आहे हे ऐकून छान वाटले, गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट उघडले पण रणनीतिच्या दृष्टीने मंदिरे मात्र बंदच ठेवली. सोनिया सेनेची वर्तणूक बाबर सेनेपेक्षाही वाईट आहे, असं कंगनाने म्हटलं आहे.

 

Protected Content