Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कंगना बडबडली : म्हणे बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती !

 

मुंबई । कोणत्याही मुद्यावरून बेधडक मत प्रदर्शन करणारी कंगना राणावत हिने आपल्याला बॉलिवुड माफियांपेक्षा आपल्याला मुंबई पोलिसांची भिती वाटत असल्याचे ट्विट केल्याने तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

आज भाजपाचे आमदार राम कदम यांनी एक ट्विट केले होते. त्यावर कंगनाने उत्तर देत बॉलीवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. कंगना राणावत ही गेल्या १०० तासांहून अधिक काळापासून ड्रग माफियांची पोलखोल करण्यास तयार आहे. मात्र, तिला पोलीस सुरक्षेची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकार ते पुरवत नसल्याचे ट्विट राम कदम यांनी केले होते. यावर कंगनाने मुव्ही माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत आहे. मुंबईमध्ये मला हिमाचल प्रदेश सरकार किंवा केंद्र सरकारची सुरक्षा हवी, मुंबई पोलिसांची नको, असे उत्तर दिले आहे. राम कदम यांनी याचे समर्थनही केले आहे.

दरम्यान, या वादग्रस्त ट्विटवर नेटकर्‍यानी खरपूस समाचार घेतला आहे. फुकटच्या प्रसिद्धीसाठी काहीही बरगळू नकोस, मुंबई पोलिसांवर विश्‍वास नसेल तर मुंबईत महाराष्ट्रात राहू नकोस, येथून निघून जा, असा सल्ला देत तिचा निषेध केला आहे.

Exit mobile version