Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कांग नदीपात्रात आढळला अनोळखी तरूणाचा मृतदेह

hivkheda news

जामनेर प्रतिनिधी । येथील हिवरखेडे बुद्रुक रोडवरील कांग नदीच्या पात्रात जुन्या बंधाऱ्‍याजवळ अनोळखी 40 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पो.नि. प्रताप इंगळे, सहाय्यक फौजदार सुभाष माळी, पो.हे.कॉ. विलास चव्हाण, हंसराज वाघ, तुषार पाटील, पं.स. सदस्य रमण चौधरी, कमलाकर पाटील, विनोद कोळी आदिनी घटनास्थळी भेट देवून मृतदेहाची तपासणी केली. मच्छिमारांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री पाटील यांच्या खबरीवरून जामनेर पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पो.ना. प्रकाश चिंचोरे करीत आहेत.

सदर इसमाचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाला असून मृतदेह पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेला आहे.सदर इसमाच्या अंगात पांढ-या रंगाची पॅन्ट व पांढ-या व काळ्या रंगाचे शर्ट असून गोल चेहरा, लांब केस, काळा सावळा रंग आहे. वरील वर्णनाच्या इसमा विषयी कोणाला काही माहिती असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन प्रताप इंगळे यांनी केले आहे.

Exit mobile version