Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातून निघणार ‘हुतात्मा कलश यात्रा’

जळगाव प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे गेल्या महिन्यात गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या वाहनाच्या ताफ्यात चार शेतकरी आणि पत्रकारांना चिरडण्यात आले होते आणि 12 शेतकरी जखमी झाले होते. त्या हुतात्म्यांची कलश मिरवणूक जळगावातून धुळे जिल्ह्यात जाणार आहे. हा निर्णय नियोजन बैठकीत घेण्यात आला.

त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. त्यात ठरले की, शिवतीर्थ मैदान वर ८/११/२१सोमवारी सकाळी अभिवादन करणे. तेथून ११व ममुराबाद, इदगाव, धानोरा, अडावद वरून चोपडा गलांगी वधोदा, होलनंथा व धुळे येथे जाईल. लोकसंघरश मोर्चा लाल बावटा शेतमजूर युनियन, भारतीय युवा लोकशाही जनक्रांती पार्टी, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा सैनिक समाज पार्टी, आदिवासी महासभा, आयटक यांचा जाहीर पाठिंबा व सहभाग राहणार आहे. असे अस्थी कलश अभिवादन यात्रा आयोजन समितीचे निमंत्रक कॉम्रेड अमृतराव महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील, भा.क.प जिल्हा सचिव लक्ष्मण शिंदे, शेतमजूर युनियनचे संघटक विनोद आड, ल.के.आय.टकचे वीरेंद्र पाटील, पी.वाय. पाटील, राजेंद्र झा, भारतीय युवा लोकशाही जन क्रांतीचे डॉक्टर आशिष जाधव, ईश्वर मोरे, गोरख वानखेडे, वासुदेव कोळी, चंद्रकांत माळी, अरमान तडवी, मधुकर मोरे, मुकुंदराव सपकाळे, एडवोकेट भरत गुजर, कालू कोळी आदींनी कळवलेले आहे. तरी अस्थिकलश अभिवादनासाठी जास्तीत जास्त शेतकरी शेतमजूर कामगार महिला यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

 

Exit mobile version