Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कलम 370 हटविल्याने भुसावळातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष (व्हिडीओ)

bhusaval bjp

भुसावळ प्रतिनिधी । केंद्र सरकारने आज राज्य सभेत काश्मीर मधील 370 व 35 अ कलम रद्द करण्याची शिफारस केल्याने येथील भाजप कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयाबाहेर जल्लोष करत निर्णयाचे स्वागत केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपा कार्यकर्त्यांनी जामनेर रोड वरील भाजपा कार्यालयाबाहेर ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडण्यात आले. तसेच मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ चे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, भुसावळचे आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Exit mobile version