Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कैलास चौधरी यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

साकेगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकरी येथील मूळ रहिवासी असणारे कैलास भावसिंग चौधरी हे सेवानिवृत्त झाले असून यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

भुसावळ तालूक्यातील साकरी येथिल व हल्ली कल्याण येथे राहणारे कैलास भावसिंग चौधरी हे त्यांची रेल्वेची ४० वर्षाची रेल्वे सेवा करुन सेवा निवृत्त झाले. त्यांना जीएम अवार्ड,डीआरएम अवार्ड सह रेल्वेचे इतर अवार्ड मिळाले आहे. शनिवारी पुणे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्सप्रेस ही शेवटची सुपरफास्ट गाडी घेऊन ते आले. त्यांचे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर ढोल ताशाच्या गजरात अधिकारी व त्यांच्या सहकार्‍यांनी स्वागत केले.

यावेळी त्यांच्या परिवारातील पत्नी व मुले वं मुलींसह मित्रवर्ग उपस्थित होते. त्यांनी आतापर्यंत केलेल्या चाळीस वर्षाच्या रेल्वे सेवा बद्दल त्यांच्या सहकार्‍यांनी व मित्रमंडळींनी त्यांच्याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या मित्रमंडळींनी मुंबईचे रेल्वे स्टेशन झगमगाट केले होते. ढोल ताशाच्या गजरात ते घेऊन आलेल्या डेक्कन क्वीन एक्सप्रेस चे स्वागत केले. त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करण्यात आला.

आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी सहाय्यक लोको पायलट, शंटिंग लोको पायलट,बँकर लोको पायलट, मोटरमन व मेल एक्सप्रेस पायलट अशी सेवा बजावली. शेवटी अधिकारी वर्ग तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांनी त्यांच्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या परिवारातील त्यांची पत्नी, मुलं, भाऊ, बहीण व सासरची मंडळीसह मित्र परिवार उपस्थित होते.

Exit mobile version