Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डोडवा फाट्याजवळच्या अपघातात कडगावचे तिघे ठार

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र-गुजराच्या सीमेजवळ असलेल्या डोडवा फाट्याजवळ झालेल्या अपघातात तालुक्यातील कडगाव येथील तिघांचा मृत्यू झाला आहे.

शेवाळी-नेत्रंग राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील असलेल्या डोडवा फाट्याजवळ असलेल्या स्वागत हॉटेलसमोर गुजरात राज्यातील चिकालीकडून (ता.सागबारा जि.नर्मदा) महुपाडा गावाकडे येत असलेल्या मोटरसायकलला (क्र.एम.एच.१९ बी.बी.५३०४) भरधाव वेगाने येणाऱ्या कारने( क्र.एम एच ४३ बी.यु.८१६२) जबर धडक दिल्याने अपघात घडला. अपघातात दुचाकीवरील असलेले मोहन कडू मोरे(वय २५), रोहित कैलास मोरे (वय १०), कुणाल एकनाथ मोरे (वय १०) हे तिघे ठार झाले असून मुक्ताबाई एकनाथ मोरे (वय ३५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. चौघे जण जळगाव तालुक्यातील कडगाव येथील रहिवासी असून ते सध्या गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील चिकाली फाटा येथे वास्तव्यास होते.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्­वर बडगुजर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खापर पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर करीत आहेत.

Exit mobile version