Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लाडू गँगचा प्रमुख संशयित आरोपी न्यायालयीन पोलीस कोठडीत

जळगाव प्रतिनिधी । माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश याच्या खून प्रकरणातील एलसीबीने लाडू गँगचा प्रमुख संशयित आरोपी आकाश मुरलीधर सपकाळे (23,रा.कांचन नगर) याला शनिवारी सकाळी अटक केली होती. खून प्रकरणातील हा पाचवा आरोपी आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

राकेश याचा 4 नोव्हेंबर रोजी खून झाला होता. त्यात गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मिक नगर), विशाल संजय सपकाळे (रा.राजाराम नगर), रुपेश संजय सपकाळे (रा.कांचन नगर) आणि महेश राजू निंबाळकर या चार जणांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने चौघांची कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, अधिकच्या चौकशीत आकाश हा देखील गुन्ह्यात निष्पन्न झाला होता. पोलिसांनी त्याला पाचव्या क्रमांकाचा आरोपी केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री पाळधी, ता.धरणगाव येथून संशयित आरोपी आकाश सपकाळे याला अटक केली होती. गुन्हा घडल्यापासून आकाश सपकाळे हा पोलिसांना चकवा देत होता. रोज गँगच्या इतर सहकार्‍यांकडून माहिती घेऊन तो राहण्याचे ठिकाण बदल करीत होता. शनिवारी सकाळी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्ह्याचे तपासअधिकारी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील सुनील पाटील, शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक बिरारी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील यांनी अटक करण्यात आलेल्या आकाश यास रविवारी जिल्हा न्यायालयाने 24 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आकाश सपकाळे यांच्या ताब्यातील लाकडी दांड्याने मारहाण केली होती, तो लाकडी दांडा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केल्याने न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Exit mobile version