Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे शिवसैनिकांचा जल्लोष

यावल प्रतिनिधी । बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला बहुमत मिळाल्याने यावल येथे तालुका शिवसेनेच्या वतीने पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला.

बोदवडच्या नगरपंचायतच्या सार्वत्रीक पंचवार्षीक निवडणुकीला सर्वच राजकीय पक्षासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने बहुमताने विजय मिळवला असुन या निवडणुकीचा यावल तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने पेढे वाटुन आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील (मुन्नाभाऊ), शरद कोळी, पप्पु जोशी, अजहर खाटीक, संतोष धोबी, मुयर  धोबी, भरत चौधरी यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.

 

 

 

Exit mobile version