Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथील सतपंथ देवस्थानात पत्रकार दिन उत्साहात

yaval r

फैजपूर प्रतिनिधी । येथील सतपंथ देवस्थानात पत्रकार दिनानिमित्त नुकताच कार्यक्रम घेण्यात आला असून सतपंथरत्न महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आजही वृत्तपत्रातील बातमीवर सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा विश्वास आहे. पत्रकारितेने वाचकांचा विश्वास संपादन केलेला आहे.कुठेही महत्त्वाच्या कामी वृत्तपत्राचे कात्रण जोडले म्हणजे ते ग्राह्य व प्रमाणित समजले जाते. म्हणून पत्रकारितेची जबाबदारी आणखी वाढते. याच जबाबदारीने यापुढेही सकारात्मक समाजाच्या निर्माणासाठी सामाजिक समरसता,एकात्मतेसाठी सर्व वृत्तपत्रांनी कार्य करावे.सर्व पत्रकार मित्र यासाठी पूर्णवेळ देऊन जे कार्य करीत आहेत ते कौतुकास्पद आहे.या कार्याला शुभेच्छा व सर्व पत्रकार बंधूंच्या दिर्घायुष्यासाठी, निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन पत्रकार बांधव त्यांचे काम चोख आणि निर्मळ पद्धतीने करत असतात. म्हणूनच सर्व पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद असते. असे प्रतिपादन सतपंथरत्न महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले आहे.

यावेळी पत्रकार अरुण होले, वासुदेव सरोदे, योगेश सोनवणे, प्रा.उमाकांत पाटील, नंदकुमार अग्रवाल, समिर तडवी, ललित फिरके, प्रा.राजेंद्र तायडे, फारूक मन्यार, मलक शाकीर, निलेश पाटील, संजय सराफ, इंदू पिंजारी, सलिम पिंजारी, राजु तडवी, मयुर मेढे, कामिल शेख, जावेद काझी आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version