Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्रकारांनी नव तंत्रज्ञानाचा स्विकार करावा -शेखर पाटील

pahur patrakar sangh programme

पहूर ता जामनेर वार्ताहर । पत्रकारांनी नव्या युगातील तंत्रज्ञानाचा स्विकार करून नवनवी तंत्र आत्मसात करावीत, असे प्रतिपादन पत्रकार शेखर पाटील यांनी केले. ते पहूर येथे शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित निबंध लेखन स्पर्धच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते.

पहूर पेठ ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पहूरचे भुमीपुत्र आणि जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ईश्‍वर गोयर होते. प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. जिल्हा परीषद कन्या शाळेच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे व रामेश्‍वर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .
याप्रसंगी सरंपच निता पाटील, कसबे सरपंच ज्योती घोंगडे, कृउबास सभापती संजय देशमुख, उपसंरपच श्याम सावळे,उपसरपंच कसबे योगेश भडांगे, शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख , ईश्‍वर जैन पतसंस्थेचे अध्यक्ष भास्कर पाटील, विकासो पेठ अध्यक्ष सतिष लोढा, कृषी पंडित पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव पांढरे,तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गोरे, ललित लोढा, अँड .एस आर पाटील, मुख्याध्यापक पी .टी. पाटील, किरण खैरणार, महात्मा फुले पतसंस्थेचे अध्यक्ष विवेक जाधव,राँ यु.काँ.ता.अध्यक्ष शैलेश पाटील,सलीम शेख गणी,संदीप बेढे, युसूफ बाबा, शंकर घोंगडे,कसबे विकासो अध्यक्ष नामदेव सोनवणे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार आनंदा काळे,डॉ. प्रशांत पांढरे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे संपादक शेखर पाटील यांनी कालानुरूप बदलणार्‍या पत्रकारितेचा अतिशय ओघवत्या शैलीत आढावा घेतला. ते म्हणाले की, आज तंत्रज्ञानामुळे पारंपरीक पत्रकारितेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे पत्रकारांनी नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करणे आवश्यक आहे. पत्रकारांची फेक न्यूजचा प्रतिकार करण्यात महत्वाची भूमिका असून आगामी काळात यासाठी सज्ज राहण्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

दरम्यान, यावेळी विविध संस्था व संघटनांतर्फ पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शरद बेलपत्रे यांनी केले. परीचय रविंद्र लाठे यांनी सांगीतला. सुत्रसंचालन शंकर भामेरे यांनी तर आभार गणेश पांढरे यांनी मानले.यशस्वीतेसाठी पत्रकार संघाने सहकार्य घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण किर्ती घोंगडे, राजेंद्र सोनवणे यांनी केले. याप्रसंगी

अ गट
प्रथम – मोनिका घोंगडे,
द्वितीय -मृणाल घोंगडे
तृतीय- अक्षय पवार
उत्तेजनार्थ – पूनम लहासे

ब गट
प्रथम – दिव्या पवार,
द्वितीय -प्रिती बोरसे ,
तृतीय – भावेश पवार,
उत्तेजनार्थ -शिवानी बोदडे

या विद्यार्थ्यांना पारीतोषीके देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version