अवैध गावठी दारू बनविणाऱ्याकडून पत्रकाराला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील गिरणा नदीच्या काठावर सुरू असलेल्या अवैध गावठी दारू भट्टीसंदर्भात वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकाराला एकाने लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना बुधवारी १५ जून रोजी सकाळी ११ वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील गिरणा नदी पात्रात गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्याप्रमाणावर अवैध गावठी दारू तयार होत आहे. म्हसावद येथील स्थानिक नागरीकांनी पत्रकार दिपक भिका महाजन (वय-३२) रा. म्हसावद ता.जि.जळगाव यांना माहिती दिली. त्यानुसार दिपक महाजन हे बुधवार १५ जून रोजी सकाळी ११ वाजता गिरणा नदी पात्राच्या काठावर सुरू असलेल्या अवैध गावठी दारू अड्ड्यावर वृत्तसंकलनासाठी गेले असता दारू तयार करणारा गजानन उर्फ भावड्या मधूकर कोळी रा. भराडी ता. जामनेर याने शिवीगाळ करून मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यात त्यांच्या मानेवर जखम झाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गजानन उर्फ भावड्या मधुकर कोळी याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content