Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जो बायडेन अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष ! : ट्रंप पराभूत

न्यूयॉर्क । गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड चुरस सुरू असणार्‍या अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल अखेर लागला असून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे.

अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला असून तेच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकल्याचा दावा अवघं एका ओळीचं ट्विट करुन केला होता. मत्र प्रत्यक्षात जो बायडन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष हे जो बायडनच होतील यात काही शंक नाही. अमेरिकेतल्या वृत्तसंस्थांनी जो बायडन यांचा विजय झाल्याचं स्पष्ट केलं आहे. ट्रंप यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विजयाचा दावा केला असला तरी त्यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागल्याचेही दिसून आले आहे.

माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिका-भारत संबंधांचे खंदे समर्थक आहेत. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उप राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडन यांनी आठ वर्ष काम केलं आहे. ओबामांसोबत बायडन यांनी भारतीय नेतृत्त्वासोबत चांगले संबंध जोपासले आहेत.

Exit mobile version