Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात 24 ऑक्टोबरपर्यंत हत्तीरोग दुरीकरण मोहिम

Hatti rog

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत सहसंचालक, आरोग्य सेवा हिवताप व हत्तीरोग यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात पोस्ट एम.डी.ए (हत्तीरोग दुरीकरण मोहीम) राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात पारोळा, एरंडोल, जळगाव तालुक्यात नशीराबाद येथे २४ ऑक्टोबरपर्यंत 8 ते 12 रक्त नमुने संकलीत केले जाणार आहे. तरी संबंधीत गावातील ग्रामस्थांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना रक्त नमुने घेण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन जिप. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पोटोळे, आणि जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील, यांनी केले आहे. आरोग्य कर्मचारी सर्व्हेक्षणासाठी आल्यानंतर आरोग्य शिक्षण व प्रतिबधात्मक उपाययोजना व विकृती व्यवस्थापनाची माहिती देत असतात. त्यास आजाराबाबतीत माहिती सांगुन नजीकच्या सरकारी दवाखान्यात तसेच सदरील रुग्णांवर करण्यात येणाऱ्‍या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात. व जे अंडवृध्दी रुग्ण असतील, अशा रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन मोफत तपासणी व ऑपरेशन केले जाणार असल्याचेही डॉ. पाटोळे व डॉ. पाटील यांनी कळविले आहे.

Exit mobile version