Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठा सुरळीत करा; भाजपाचे निवेदन (व्हिडिओ)

 

जळगाव प्रतिनिधी । थकित विजबिलांच्या कारणावरून शेतकऱ्यांच्या शेतातील विजपुरवठा वारंवार खंडीत केला जात आहे. शेतकऱ्यांचा विजपुरवठा सुरळीत करावी या मागणीसाठी भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीष महाजन यांनी महावितरण कार्यालयात जावून निवेदन दिले.

यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन म्हणाले की, शेतकऱ्यांवर अधिक अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यात त्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. सध्या रब्बी हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात गहू, हरभरा व इतर पिकांची पेरणी केली आहे. परंतू महावितरण विभागाने थकित विजबिल कारणावरून शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडीत केला आहे. वारंवार यासंदर्भात भाजपाने निवेदन दिले परंतू यावर काहीही कारवाई केली जात नाही. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विजपुरवठ्याचा वापर केला नसल्यामुळे जादा बिले अदा केली आहे. शेतातील खंडीत केलेला विजपुरवठा तातडीने सुरू करावी अशी मागणी केली आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने अयोध्या नगरातील महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version