जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याबाहेर पकडले चार बिनविषारी तस्कर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या बंगल्याबाहेर आज रात्री 9.30 वाजेच्या सुमारास सर्पमित्रांनी चार बिनविषारी तस्कर पकडून त्यांना जंगलात सोडण्यात आले आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या बगल्याबाहेर शनिवारी रात्री 9.30 वाजेदरम्यान फुटपाथवर साप असल्याची माहिती पायदळ जाणाऱ्या एका महिलेने बगल्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला सांगितले. त्यानुसार तातडीने सर्पमित्र जगदीश बैरागी, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, राजेश सोनवणे, जगदीश बैरागी, शुभम पवार यांच्यासह सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेवून अर्ध्या तासात एकाचवेळी चार तस्कर पकडले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन गणेश रावळ, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची उपस्थिती होती. चारही तस्करांना वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्यांनी त्यांना पकडून उजाड कुसुंबा जंगलात सोडून देण्यात आले.

Protected Content