Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा कारागृहात तिघांकडून एका कैद्यावर प्राणघातक हल्ला

Jilha karagruh news

जळगाव प्रतिनिधी । जुन्या वादाच्या कारणावरून तीन कैद्यांनी एका कैद्यावर प्राणघातक हल्ला चढवत लोखंडी पट्टीने जखमी केल्याची घटना जिल्हा कारागृहात सकाळी 7.30 वाजता घडली. याप्रकरणी तीन कैद्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. जखमीस जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की,   जिल्ह्यातील पोलिसांना आव्हान देणारा कुख्यात गुंड शुभम मनोज देशमुख उर्फ शिवम उर्फ दाउद (वय 21) हा गेल्या वर्षभरापासून प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात न्यायालयालयीन कोठडीत होता. त्याठिकाणी इतर गुन्ह्यात असलेले तीन कैदी राकेश वसंत चव्हाण, राजू वसंत चव्हाण हे दोघे भाऊ आणि राहूल पंढरीनाथ पाटील या तिघांनी जुन्या वादातून आज सकाळी 7.30 वाजता नियमितपणे उठल्यानंतर शुभम देशमुखच्या पाठीमागुन येवून बेदम मारहाण केली. यातील एकाने लोखंडी पट्टी घेवून त्यांच्या तोंडावर व कंमरेवर वार करत गंभीर जखमी केले आहे. जखमी अवस्थेत शुभमला जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा पेठ पोलास ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री पटेल यांनी जखमी कैद शुभमचा जबाब नोंदविण्यात आला असून मारहाण करणारे तिन्ही कैदींविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान नेमके मारहाण कोणत्या कारणावरून झाली हे अद्याप समजू शकले नाही.

Exit mobile version