Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा रूग्णालयातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जिल्हा रूग्णालयातील पार्किंग झोनमधून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. दुचाकी चोरतांना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विजय दत्तात्रय जगताप (वय-४५) रा. ईश्वर कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. जिल्ह शासकीय रूग्णालयात नोकरीला आहे. १८ मे रोजी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता विजय जगताप हे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुचाकी (एमएच १५ सीएफ ९७०२) ने कामावर आले. महाविद्यालयातील पार्किंग झोनमध्ये त्यांनी दुचाकी पार्क करून लावली व कामावर निघून गेले. दुपारी २ वाजता ते दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध केली पंरतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. याबात जगताप यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवार २३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सलीम तडवी करीत आहे.

Exit mobile version