जिल्ह्यात आज २०५ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह तर २३१ रूग्ण झालेत बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार आज जिल्ह्यातील २०५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर आजच २३१ रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायमच असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यासोबत आता बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात २०५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे आजच २३१ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज १२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात २०५ कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ६० रूग्ण हे जळगाव शहरातल आहेत. याच्या खालोखाल धरणगाव-२५, भुसावळ व रावेर तालुक्यात प्रत्येकी २० रूग्ण आढळून आले आहेत.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण १८, अमळनेर-८, चोपडा-५, पाचोरा-१३, भडगाव-८, यावल-७, एरंडोल-४, जामनेर-९ पारोळा-१, चाळीसगाव-६, इतर जिल्हे-१ असे एकुण २०५ रूग्ण आज आढळून आले आहे.

तालुकानिहाय एकुण रूग्णसंख्या
जळगाव शहर- २६३१, जळगाव ग्रामीण-४७६, भुसावळ-८५०, अमळनेर-६६६, चोपडा-७०३, पाचोरा-३२९, भडगाव-४०३, धरणगाव-४६५, यावल-४३३, एरंडोल-४७५, जामनेर-६९६, रावेर-६७३, पारोळा-४५२, चाळीसगाव-४१७, मुक्ताईनगर-३१८, बोदवड-२२४, इतर जिल्हे-३८ असे एकुण १० हजार २४९ रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ६ हजार ७३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. बाधितांपैकी ३ हजार ३२ रूग्ण उपचार घेत असून आजपर्यंत ४८१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content