Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बसप्रवासात महिलेच्या बॅगेतून ६२ हजारांचे दागिने लांबविले

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अक्कलकुवा ते चाळीसगाव दरम्यान बसमध्ये प्रवास करत असतांना मेहुणबारे गावानजीक महिलेच्या बॅगेतून ६२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरू नेल्याची घटना गुरूवारी २९ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी २ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वाती मोहन परदेशी वय ३२ रा. धुळे या महिला कामाच्या निमित्ताने गुरूवारी २९ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अक्कलकुवा ते चाळीसगाव असा बसमध्ये प्रवास करत असतांना मेहुणबारे गावाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या सीटच्या खाली ठेवलेल्या बॅगेतून ६२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय शिंदे हे करीत आहे.

Exit mobile version