Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेचे पंच म्हणून जीवन महाजन यांची निवड

WhatsApp Image 2019 12 30 at 6.36.19 PM

रावेर, प्रतिनिधी | राजस्थान येथे होणाऱ्या ६५ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत दि.१ ते ५ जानेवारी २०२० रोजी पंच म्हणून जीवन प्रभाकर महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

जीवन महाजन हे स्वामी स्पोर्ट क्लबचे रावेर प्रशिक्षक व शा.प्रा.आ.शाळेचे टाकवहाळ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्हा असोसिएशनचे सचिव प्रशिक्षक अजित घारगे, रावेर तालुका संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष दिपक नगरे, डॉ. संदीप पाटील, डॉ. सुरेश महाजन, प्रमोद पाटील, आयुष अग्रवाल, रवींद्र पवार, जे. के. पाटील, श्रीकांत महाजन , वाय.पी.माळी, जयेश बिरपन, तेजस्विनी श्रीखंडे, जयेश कासार, मंगेश महाजन, संदीप बारी, राहुल पाटील, कल्पेश महाजन आदींनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version