Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जेसीआय खामगाव जय अंबे पद ग्रहण सोहळा उत्साहात

खामगाव प्रतिनिधी । नुकत्याच गठित झालेल्या जेसीआय खामगाव जय अंबेचा पद ग्रहण सोहळा शेगांव येथील हॉटेल लखदातार यीन येथे संपन्न झाला. 

51 नवीन मेंबर सोबत सुरू झालेल्या या लोमच्या संस्थापक अध्यक्षपदी जेसी शालिनी राजपूत, सचिव जेसी सौरभ चांडक, कोषाध्यक्ष जेसी योगेश खत्री, जेसीरेट चेयरपर्सन देवांशी मोहता, जू. जेसी तरुण अग्रवाल यांनी शपथ ग्रहण केली. या प्रसंगी मुख्य अतिथि म्हणुन जेसीआय इंडिया च्या राष्ट्रीय अध्यक्षा जेसी सीनेटर राखी जैन रांची या उपस्थित होत्या.  झोन 13 च्या इतिहासात प्रथमताच राष्ट्रीय अध्यक्षा पदग्रहण समारंभात मुख्य अतिथि म्हणुन उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात स्त्री पुरुष समानता व स्त्री सशक्तीकरण याची गरज असल्याचे सांगितले. 

या प्रसंगी जेसी अनूप गांधी झोन प्रेसिडेंट, जेसी ऋषभ शहा झोन उपाध्यक्ष झोन 13 , जेसी संकेत नावंदर, जेसी जितेंद्र बोरा,  जेसी डॉ भगतसिंग राजपूत हे मंचावर उपस्थित होते. या प्रसंगी जेसी आय खामगाव जय अंबे द्वारा टिळक राष्ट्रीय शाळेच्या समोरील शेतात जेसीआय जयअंबे पंचवटी हा उपक्रम राबवणार असल्याचे डॉ भगतसिंग राजपूत यांनी जाहीर केले. या उपक्रमात होस्टेल मधील विद्यार्थ्यांच्या सहाय्याने, त्यांच्या करिता सेंद्रिय शेती द्वारे भाजीपाला व फळबाग विकसित केली जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती बद्दल शास्त्रोक्त महती मिळणार आहे. 

तसेच ओसाड पडीक जमिनीवर वनराई विकसित केली जाणार असल्याची माहिती डॉ भगतसिंग राजपूत यांनी दिली.  या प्रसंगी जेसी डॉ गौरव गोएंका, जेसी सौरभ चांडक, जेसी योगेश खत्री ,जेसी अँड रितेश निगम, जेसी अमोल,जेसी कुणाल भिसे, जेसी कौस्तुभ मोहता, जेसी सोनाली टिंबाडीया, जेसी अँड वाधवानी, जेसी मंगेश, जेसी डॉ अनूप शंकरवार , जेसी डाॅ. आनंद राठी, जेसी रोहन जैस्वाल, जेसी निखिल लाठे, डॉ गौरव लड्डा, जेसी सुनिल राठी,जेसी डाॅ. मंजुषा वऱ्हाडे ,जेसी सुरभी गोएंका, सदस्य उपस्थित होते.  मंच संचालन  जेसी अपूर्व देशपांडे, जेसी कोमल भिसे यांनी केले आभार प्रदर्शन सौरभ चांडक यांनी केले.

Exit mobile version