Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जेसीआय चाळीसगाव सिटीतर्फे उद्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 08 at 11.17.43 AM

चाळीसगाव,प्रतिनिधी | जेसीआय चाळीसगाव सिटीतर्फे ‘करीअर विषयी बोलू काही’ या अंतर्गत विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन उद्या सोमवार ९ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.

जेसीआय चाळीसगाव सिटीजेसी सप्ताह २०१९ अंतर्गत इयत्ता ८, ९, १० तसेच ११ वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना जेईई, आय.आय.टी, नीट, सिईटी या परिक्षांबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सोमवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आर. के. लाॅन्स श्रीपत नगर येथे घेण्यात येणार आहे. यावेळी औरंगाबाद येथील डॉ. यशपाल  कदम हे मार्गदर्शन करणार आहेत.तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित रहावे जेणेकरून या परिक्षांची तयारी करण्यासाठी मदत होईल असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version