Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुष्पाताई महाजन यांच्या प्रचारार्थ जयेश महाजन यांचा संवाद दौरा

257fe309 8f63 41e7 8efc ee68e8ba5218

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण मतदार संघातील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार पुष्पाताई महाजन यांच्या प्रचारार्थ जयेश महाजन मित्र परिवाराने आज सकाळी शहरातील मतदारांसोबत संवाद साधला. यावेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आज सकाळी शहरातील धरणी परिसरात राष्ट्रवादीच्या पुष्पाताई महाजन यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. धरणी परिसरातून ही रॅली निघाली. यावेळी कार्यकर्त्यांनी पुष्पाताई महाजन यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी उमेदवार जयेश महाजन मित्र परिवारातील असंख्य सदस्य उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी परिसरातील व्यापारी, मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच येत्या २१ तारखेला राष्ट्रवादीला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी विजय असो…पुष्पाताई यांचा विजय असो…अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Exit mobile version