Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जयंत पाटील राष्ट्रवादीचे नवीन विधीमंडळ पक्षनेते

jayant patil

मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांच्या जागी आता जयंत पाटील यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अजित पवार यांनी बंडाचा पवित्रा घेतल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीच्या पक्षनेतेपदावरून हटविले जाईल हे मानले जात होते. या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू असणार्‍या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर जयंत पाटील यांची या पदावर तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबत अजित पवार आता पक्षाच्या आमदारांसाठी व्हिप काढू शकणार नाहीत. हे अधिकारदेखील आता दिलीप वळसे पाटील यांना सुपुर्द करण्यात आले आहे.

Exit mobile version