Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाथाभाऊच्या भेटीला जयंत पाटील; मुस्लिम युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बैठक प्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या घरी यांनी भेट दिली.

या प्रसंगी मुक्ताईनगर शहरातील असंख्य मुस्लिम समाजातील युवकांनी रोहिणी खडसे खेवलकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवक शहर प्रमुख बबलू सापधरे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला

यात जुबेर अली, इरफान खान, अज़हर आतिश, कौसर अली, शोएब पठान, इमरान शाह, जुबेर खान, मुश्ताक मन्यार, अन्नू पेंटर, इस्माइल मन्यार, इस्माइल शाह, शाहरुख शाह, हमजा शाह, अकरम बागवान, बबलू भांजा, रईस, शैख सलमान, असलम शाह, उस्मान अली, साबिर अली, अशफाक आणि समीर या युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Exit mobile version