उमेदवार आयातीतून भाजपची ‘ताकद’ लक्षात येते : जयंत पाटील ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । आजही भाजपला आम्ही नाकारलेले उमेदवार आयात करावे लागतात, यावरून त्यांची ‘ताकद’ किती आहे हे दिसून आल्याचा मिश्कील टोला आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मारला. ते येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त मेळाव्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, रावेरचा उमेदवार हा एक-दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेससोबत चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, त्यांनी याप्रसंगी भाजपवरही टीका केली. ते म्हणाले की, आधीच उमेदवार आयात करून भाजपने पाच वर्षे सत्ता उपभोगली आहे. मात्र आताही आम्ही नाकारलेल्या उमेदवारांना त्यांना आयात करावी लागत असल्यामुळे त्यांची ताकद लक्षात येत असल्याचा टोला त्यांनी मारला. या पत्रकार परिषदेला पक्षाचे ज्येष्ठ आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हा कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील, महानगराध्यक्ष नामदेवराव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

पहा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील नेमके काय म्हणाले ते !

Add Comment

Protected Content