जयनगरातील शासकीय मक्तेदाराची ४५ लाखात फसवणूक ; गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शासकीय मक्तेदार असलेल्या ७० वर्षीय वृध्द व्यक्तीची चार जणांनी सुमारे ४५ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लालसिंग हिलालसिंग पाटील (वय ७०, रा. जयनगर) हे शासकीय मक्तेदारीचे काम करतात.  त्यांचे एल. एच. पाटील कन्स्ट्रक्शन प्रा. लि. नावाची फर्म आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नाना उखा बोरसे यांच्या अधिपत्याखाली ते कामे घेत असतात.  १० जानेवारी २०१७ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालन अधीक्षक अभियंता बसवराज शिवराज पांढरे यांच्या शासकीय निवासस्थानी अक्षय ओंकार चोपडे (रा. पुणे), नाना बोरसे हे काम करतात. लालसिं पाटील यांना बोलावून घेतले. तेथे अक्षय चोपडे या मक्तेदाराची ग्रव्हीटी ग्रृप नावाने त्यांची कंपनी आहे. जिल्ह्यातील २५-३० लाख रुपयांपर्यंतची कामे त्यांना द्या अशी विनंती नाना बोरसे यांनी लालसिंग पाटील यांना केली. त्यानुसार लालसिंग पाटील यांनी त्यांच्या मालकीच्या शिरसोनी व नागदुली शिवारातील शेताच्या शेडचे बांधकाम करण्याचे काम अक्षय चोपडे यांना दिले. त्यापोटी १३ लाख ७८ हजार रुपयांचा धनादेशही दिला. पैसे दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सरुवात केली नाही म्हणून लालासिंग पाटील यांनी फोन करुन विचारपुस केली. त्यावेळी अक्षय चोपडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लालासिंग पाटील यांनी गुरुवारी ९ जून रोजी दुपारी  रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नाना उखा बोरसे, अक्षय ओंकार चोपडे, दीपक गंगाराम लांघी व सुयेश गजानन तिटकरे या चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरूवातीला दिलेले १३ लाख ७८ हजार रुपये, शासकीय नियमानुसार त्यावरील व्याज व शेडच्या कामाची आजची किंमत असे एकुण ४० ते ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे नमूद केले आहे.

 

 

Protected Content