Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या

images 2

नवी दिल्ली (वृत्तसेवा) ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देण्यात आल्या नव्हत्या, असं दंडाधिकाऱ्यांनी अहवालात म्हटलं आहे.  यासंदर्भातील व्हिडीओत छेडछाड करण्यात आलेली  होती , असेदेखील  या अहवालात नोंदविण्यात आले आहे.. हा अहवाल दिल्ली सरकारला आज सादर केला जाऊ शकतो. एकूण 25 पानांच्या या अहवालात जेएनयूमध्ये घडलेल्या घटनांचा क्रम देण्यात आलेला आहे.

न्यूज18 नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, जेएनयू प्रकरणात दोन व्हिडीओ समोर आले. यातील एक व्हिडीओ 9 फेब्रुवारीचा, तर दुसरा 11 फेब्रुवारीचा होता. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं जेएनयूमधील कार्यक्रमासाठी बोलावलं होतं, अशी माहिती दंडाधिकाऱ्यांच्या अहवालात आहे. यामध्ये जेएनयूच्या एन्ट्री रजिस्टरचा उल्लेख आहे. संबंधित वृत्तवाहिनीनं या संदर्भातील व्हिडीओ आदेश देऊनही दंडाधिकाऱ्यांना सोपवला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. टीव्हीवर दाखवण्यात आलेल्या आणि इंटरनेटवर व्हायरल झालेल्या जेएनयूमधील व्हिडीओंची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.

 

 

Exit mobile version