Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जसप्रीत बुमराह लवकरच भारतीय संघात पुनरागमन करणार

Jasprit Bumrah

मुंबई वृत्तसंस्था । जसप्रीत बुमराह हळूहळू आपल्या जुन्या फॉर्मात परततो आहे. मात्र, अद्यापही त्याच्या दुखापतीबद्दल अंतिम अहवाल मिळालेला नाहीय. पुढच्या महिन्यापर्यंत तो भारतीय संघात परतणार नसून न्यूझीलंड दौऱ्यासाठी तो संघात परतू शकतो, असे मत निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर बांगलादेशवर मात केली. टी-२० मालिकेत २-१ आणि कसोटी मालिकेत भारताने २-० ने विजय मिळवला. जसप्रीत बुमराह गेले काही दिवस आपल्या पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. मात्र, भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांची मालिका खेळेल. यानंतर २०२० साली भारतीय संघ जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. अशी माहिती प्रसाद यांनी दिली आहे.

Exit mobile version